in

राज्यपाल हवाई प्रवास प्रकरण ; भाजप नेत्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यातील वाद मिटताना दिसतं नाही आहे. अशातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच न दिल्याच्या प्रकरणी विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ”अशा निर्णयांसाठी ठाकरे सरकार नेहमीच लक्षात राहील .”असे म्हणतं ठाकरे सरकावर टीकास्त्र सोडले आहे.

राज्यपाल मुंबईतून ते प्रथम राज्य शासनाच्या चार्टर विमानाने देहराडून येथे जाणार होते. त्यासाठी ते विमानतळावर गेल्यावर उड्डाण घेण्याचे परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यपाल यांनी चार्टर विमानाऐवजी रेग्युलर फ्लाईटने देहरादून येथे गेले. राज्य शासनाने चार्टर फ्लाईट पूर्व नियोजित उपलब्ध करून द्यावे, असे राजभवनाकडून सांगण्यात आले होते. ते उपलब्ध का करून दिले गेले नाही याची माहिती तुर्तास उपलब्ध झालेली नाही.

“राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. राज्य सरकार अहंकारी झाले असून राज्यपालांना विमान नाकारणं हे दुर्दैवी आहे.” अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र मला हे प्रकरण माहिती नाही. मंत्रालयामध्ये जावून माहिती घेऊन यावर बोलेन, असं स्पष्ट केलं आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ”अशा निर्णयांसाठी ठाकरे सरकार नेहमीच लक्षात राहील .”असे म्हणतं ठाकरे सरकावर टीकास्त्र सोडले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘या’ जिल्हात कोरोनाचा पुन्हा स्फोट

सुशांत मृत्यूप्रकरणी NCB कडून मोठा खुलासा