in

Maharashtra Unlock; महाराष्ट्र अनलॉक? सरकारमधील संभ्रमावस्थेवर फडणवीसांसह भाजप नेते कडाडले…

राज्यात 5 टप्प्यात लॉकडाऊन हटवण्यात आल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्याच्या काही तासानंतर राज्य सरकारने या सबंधित प्रस्ताव विचाराधीन असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याची टीका होऊ लागली होती. तसेच नागरिकांमध्ये सुद्धा संभ्रमावस्था निर्माण झाली होती. महाविकास आघाडीच्या या गोधळी कारभारावर आता भाजप नेत्यांनी सडकून टीका केली आहे.

अपरिपक्वता की श्रेयवाद?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित करत सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचा खोचक टोला हाणला. काय सुरु, काय बंद? कुठे आणि केव्हा पर्यंत? लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद? अशी प्रश्नांची सरबत्ती करत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत संभ्रमावस्थेवर बोट ठेवले.

सरकार आहे की सर्कस?

मंत्री घोषणा करतात निर्बंध हटवणार, एका तासाने शासन निर्णय जाहीर होतो तसं काही नाही हो… हे सरकार आहे की सर्कस? ठाकरे सरकारची जत्रा, त्यात कारभारी सतरा, गोंधळी सरकार, अनलॉकवरुन गोंधळ. तथाकथित विचारी मुख्यमंत्र्यांना बहुदा मंत्रीच विचारत नाहीत अशी स्थिती असल्याची टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केलीय.

‘अंधेर नगरी चौपट राजा’

अंधेर नगरी चौपट राजा अशी अवस्था महाआघाडी सरकारची झाली आहे. कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही. विजय वडेट्टीवार प्रेस घेऊन अनलॅाकडाऊन केल्याची घोषणा करतात. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीतबैठकीत निर्णय झाल्याचे सांगतात, काहीवेळानतंर सरकारी प्रेसनोट येते अनलॅाकडाऊनचा प्रस्ताव आहे निर्णय नाही, असा खोटक टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजप नेता गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ; औषध साठ्याचा आरोप सिद्ध

Dharavi Corona ; धारावीत सापडला आज फक्त कोरोनाचा एकच रुग्ण!