in

भाजपा आमदार गणेश नाईकांच्या नातवाला मारहाण

माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्या नातवासह दोघांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन ही मारहाण झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिघांचा शोध सुरु आहे. माळशेज घाटाच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला आहे.

गणेश नाईक यांचे नातू संकल्प नाईक व मित्र तजेंद्रसिंग मंत्री याच्यासह कृषी केंद्र शोधत असताना तळवली गावाजवळ पोहोचले. तिथे त्यांनी आपली चारचाकी गाडी अचानक वळवली. यावेळी मागून येणारी दुचाकी कारला धडकली.यावेळी खाली पडलेला दुचाकीस्वार प्रवीण लिहेयाची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या संकल्प नाईक आणि तजेंद्रसिंग मंत्री यांना निलेश देसले आणि त्यांच्या तीन साथीदारांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मेळघाटातील RFO दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल

होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल; विशेष ट्रेन तीन तास उशीराने