in

भाजप आमदाराचे स्टिंग ऑपरेशन; कन्नड घाटातील वसूलीचा केला भांडाफोड

सचिन बडे, औरंगाबाद | कन्नड चाळीसगाव घाटात ट्रॅफिक पोलिसांकडून सुरू असलेल्या वसुलीचा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला पर्दाफाश केला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्रकचालकाने वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन करून ट्रॅफिक पोलिसांचा गोरख धंदा उघड केला. त्यामुळे आता ट्रॅफिक पोलिसांचे धाबे दणाणले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात महाराष्ट्र पोलीस ट्रक चालकांकडून पैसे वसुली करत होती. याची खात्री करण्यासाठी चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्रकचालकाने वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले. त्यांनी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला. यावेळी घाट बंद असतांना देखील त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली असता त्यांनी थोडे कमी करा अस सांगत ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले असता सदर पोलिसाने ते देण्यास नकार दिला.

नंतर ड्रायव्हर बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला. त्यानतंर मात्र, आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांनी पळ काढला. या घटनेनतंर आमदार चव्हाण यांनी या ठिकाणी असलेल्या ट्रकचालकांची चर्चा केली. त्या चालकांनी या ठिकाणी नेहमी वसुली केली जात असल्याचे सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंह यांची तब्बल 7 तास चौकशी,उद्या पुन्हा चौकशीची शक्यता ?

Corona Vaccination : महाराष्ट्रात ११ कोटी नागरिक बनले बाहुबली