in ,

भाजपला धक्का; मुकुल रॉय यांची मुलासह ‘टीएमसी’त घरवापसी

भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय मुलगा शुभ्रांशू रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर आता पुन्हा एकदा भाजपाला मोठा झटका बसला आहे.

मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमध्ये भविष्यात महत्वाची भूमिका निभवातली, असं म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले. तर मुकुल रॉय यांनी, ”मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत भाजपामध्ये कुणीही राहू शकत नाही.” असं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

कोण आहेत ?

१९९८ पासून ते बंगालच्या राजकारणात सक्रीय असलेले मुकुल रॉय हे टीएमसी सोडणारे सर्वात पहिले नेता होते. पक्षविरोधी कारवायाच्या ठपका ठेवत तृणमूल काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी बाहेर केले होते. टीएमसीमध्ये असताना मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नेते मानले जात होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Central Railway; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Sagar Rana Murder : सुशील कुमारच्या न्यायालयीन कोठडीत वाढ