in

भिवंडीत वऱ्हाळ देवी मंदिरा बाहेर भाजपाचे शंखनाद आंदोलन

राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असून या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग व्यवसाय ब्रेक द चेन च्या माध्यमातून सुरू करण्यात आले. मात्र अद्याप मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली नसल्याने भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले.

दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय आघाडीचा यामध्ये प्रामुख्याने सहभाग होता. भिवंडी शहरातील आराध्य दैवत वऱ्हाळ देवी मंदिरा बाहेर शंखनाद करून बंद मंदिर उघडण्यात आले. बार उद्धवा तुझे अजब सरकार या घोषणांसह राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. या आंदोलनात अनेक भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद करण्यापेक्षा लस मिळवण्यासाठी शंखनाद करा

कोल्हापूर | अंबाबाई मंदिराजवळ भाजपाचे आंदोलन