in

मुंबई महापालिका सभागृहात राडा, भाजप-शिवसेनेचे नगरसेवक भिडले

मुंबई महापालिका सभागृहात भाजप-शिवसेनेचे नगरसेवक एकमेकांसमोर भिडल्याची घटना घडली आहे. या घटनेने महापालिका सभागृहात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. बीडीडी चाळीतील गॅस सिलिंडरचा स्फोट प्रकरणातील रूग्णांच्या उपचारास दिरंगाई करण्यात आली होती. त्यामुळे या घटनेत चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून भाजप-शिवसेनेचे नगरसेवक आमने सामने ठाकले होते.

वरळीच्या बीडीडी चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या दाम्प्त्यावर नायर रुग्णालयात उपचारास दिरंगाई करण्यात आली. या दुर्घटनेत भाजलेल्या चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा मुद्दा भायखळा येथील राणीबागेतील शाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात भाजपच्या नगरसेवकांनी उचलत जोरदार गोंधळ घातला.

या घटनेवरुन आक्रमक झालेल्या भाजप नगरसेवकांनी आरोग्य समितीचा राजीनामा दिला होता. हा मुद्दा आज सभागृहात चर्चेला आला. भाजप नगरसवेकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावर बोलताना स्थायी समिती यशवंत जाधव यांनी भाजपचे लोक राजीनामा देतात, आम्ही शिवसेनेचे लोक मात्र लढतो, असे विधान केले. यावरुन भाजप नगरसेवक संतापले आणि त्यांनी यशवंत जाधव यांना घेरले. यानंतर शिवसेना नगरसेवकही आक्रमकही झाले आणि दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.

प्रकरण काय ?

वरळी येथील बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटातील चार जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नायर रुग्णालय आणि पालिका प्रशासनावर टीकास्त्र उठले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेने या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. मात्र प्राथमिक चौकशीनंतर दोन डॉक्टर आणि एक परिचारिकेला गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फिल्मी स्टाईलने अडीशे किलोमीटर पाठलाग; नेपाळी वॉचमन गॅंगला ठोकल्या बेड्या

दोन हजार रुपयांकरिता इसमाची गाडीने उडवून हत्या