लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटी ट्वीट प्रकरणी कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं. परंंतु या सगळ्या दरम्यान, टिकटॉक सेलिब्रिटी पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली. यानंतर सर्व प्रकरणाला राजकीय रंग लागला आहे. भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांवर टीका केली आहे. पूजा चव्हाणच्या प्रकरणात अद्याप एफआयआर न नोंदवणाऱ्या गृहमंत्र्यांनी भाजपाच्या आयटी सेल वर कारवाई करण्याची मागणी केली आहे, असा टोला भातखळकरांनी लावला आहे.
“पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणाला दहा दिवस उलटून गेले तरी साधा एफ आय आर न नोंदवणारे राज्याचे गृहमंत्री सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्या देशहिताच्या ट्विटसाठी भाजपच्या आयटी सेलची चौकशी करणार आहेत…”, हे ट्वीट भातखळकरांनी केले आहे.
काय आहे प्रकरण?
मागील दोन महिन्यांहून जास्त काळ सुरू असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात अनेक सेलिब्रिटीजने ट्वीट केले. यामध्ये सचिन तेंडुलकर तसेच लता मंगेशकर यांचा समावेश होता. या सर्व सेलिब्रिटींना भाजपाच्या नेत्यांनी ट्वीट करायला लावले, असा आरोप होत आहे. अनेकांच्या ट्वीटमधील आशय सारखा असल्याने ट्वीट वॉर रंगले होते. हे सर्व प्रकरण स्क्रिप्टेड असल्याचा संशय गृहमंत्रालयाला आल्याने अखेर पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख तसेच अन्य काही जणांवर कारवाई होणार असल्याची महिती समोर आली आहे. या प्रकरणी अनिल देशमुख यांनी संकेत दिलेत. मात्र लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची चौकशी होणार नसल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी म्हटलंय.
Comments
Loading…