in

मुंबईत भाजपाचं ठिकठिकाणी चक्का जाम

भाजप आज (27 फेब्रवारी) मुंबईत ठिकठिकाणी चक्काजाम केले जाणार आहे. सकाळी 10 वाजता या चक्काजामला सुरुवात होईल. हरी ओम नगर, म्हाडा कॉलनी नंतरचा सिग्नल, मुलुंड पूर्व हायवे येथे हे आंदोलन होईल. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. या प्रकणानंतर भाजपने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपा चक्काजाम करणार आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या महिला मोर्चातर्फे मुंबईतील आजचे आंदोलनाच होणार आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूची चौकशी करवी तसेच वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, या मागण्या भाजपच्या महिला मोर्चाने केल्या आहेत. या आंदोलनाची सुरुवात सकाळी 10 वाजता होणार असून भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार असल्याचे समजते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! आज मराठी भाषा दिन

संयुक्त राष्ट्रसंघातील पदावर आणखी एका भारतीय महिलेची वर्णी