in

6 महिन्यांत भाजपच्या ‘या’ चार मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

केंद्रात बहुमत असलेल्या भाजपचे चार मुख्यमंत्री राजीनामा देत सहा महिन्यांत घरी गेल्याचे चित्र आहे. किंबहुना भाकरी परतण्यासाठी भाजपने त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे, असे राजकीय तज्ज्ञ म्हणतात.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीला 15 महिन्यांचा अवधी बाकी असताना मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत राजीनामा देणारे रुपाणी हे भाजपाचे चौथे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले आहेत.

आतापर्यंत ‘या’ मुख्यमंत्र्यांनी दिले राजीनामे

भाजपमध्ये मार्च महिन्यांत तत्कालीन मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या ऐवजी खासदार तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री बनवले होते. अवघ्या चार महिन्यानंतर जुलै महिन्यात तीरथ सिंह रावत यांनाही हटवून त्यांजागी पुष्कर सिंह धामी यांच्याकडे मुख्यंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली. तर कर्नाटकातही मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर बीएस बोम्मई यांना मुख्यंमंत्री बनवण्यात आले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Virar

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राजकारणात; ‘या’ पक्षात करणार एन्ट्री