in

बंगळूरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर फेकली काळी शाही

नंदकिशोर गावडे, बेळगाव | कर्नाटकात भगवा ध्वज जाळल्याची घटना ताजी असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळी शाही फेकल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. या संदर्भातला व्हिडीओ सोशल मिडीयावर आक्रमक झाले आहेत. लोकशाही न्यूज यावर कोणतीही पुष्टी करत नाही. या घटनेने आता शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी बेळगाव मध्ये मध्यवर्ती एककीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून बेळगाव बंदची हाक देण्यात आली होती.या बेळगाव बंदला पाठिंबा म्हणून कोल्हापुरा सह महाराष्ट्रतील अनेक भागात लाल पिवळा झेंडा जाळण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून बेंगलोर येथील सांकीकेरे या ठिकाणी कन्नड कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडावर शाई ओतण्यात आल्याचं म्हटलं जातंय.मात्र यानंतर आता बेळगाव सह सीमाभागात शिवप्रेमीमधून मोठा संताप व्यक्त होतोय…कर्नाटकात भगवा जाळण्यात आला वं शाही फेकण्याऱ्यावर कठोर कारवाही करावी आश्या आशयाचं निवेदन उद्या बेळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र एक्कीकरण युवा समितीकडून सांगण्यात येतंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘मजनू’ चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच

“इंदिरा गांधींचं नाव घ्यायला भय वाटतं की लाज?” शिवसेनेची मोदी सरकारवर टिका