in

जेष्ठ अंध कवी चंद्रकांत देशमुखे यांचे निधन

सांगली कडेगाव येथील जेष्ठ अंध कवी चंद्रकांत देशमुखे यांचे ह्रदय विकाराने निधन,महाराष्ट्रातील डोळस कवीच्या जाण्याने साहित्य क्षेत्राला धक्का लागला आहे . बालपणापासून अंध व शिक्षणाचा कसलाही गंध नसलेले कडेगाव येथील संवेदनशील व्यक्तिमत्त्व व धान्याचे प्रसिद्ध व्यापारी कवी चंद्रकांत देशमुखे उर्फ बाबूजी यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी आज बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या घरी निधन झाले. आपल्या कवितेतून देशभक्ती रुजविण्याचे त्यांचे काम गेली ५७ वर्षे अविरतपणे सुरू होते.त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
देशमुखे हे कडेगाव – खानापूर तालुका साहित्य परिषदेचे संस्थापक – सदस्य तर विद्यमान खजिनदार म्हणून कार्यरत होते. परिषदेच्या माध्यमातून साहित्य चळवळ वाढीसाठी या दोन्ही तालुक्यात विविध साहित्यिक कार्यक्रम राबवून मोठे बळ दिले होते. जिल्ह्यातील साहित्यिकांनाही त्यांचे पाठबळ राहिले होते. सांगली जिल्ह्यातील साहित्य चळवळीला बळ देण्याचं काम त्यांनी नेहमीच केलं आहे. हातकणंगले येथे झालेल्या अखिल भारतीय अंध अपंग साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. महाराष्ट्र, कर्नाटक , गोवा राज्यात त्यांनी आपल्या कविता सादर केल्या होत्या. रेणावीचा श्रीमती शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sushant Singh Rajput | रुह जुडे, जुडी रेह जाये… म्हणतं सुशांतच्या आठवणीत क्रिती सेनन भावुक

परभणी जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता