in ,

Bollywood | शाहरुख-अक्षय एकत्र का काम करत नाही?

आपन सर्वांनी १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दिल तो पागल है’ हा हिंदी चित्रपट पाहीलाच असेल. त्यातील शाहरुख खान व अक्षय कुमार यांची जोडी सर्वांनी पाहिली आणि सर्वांना आवडली सुद्धा. पण हे दोघेही परत कधी कोणत्याही चित्रपटात एकत्र आलेच नाही. अस काय झालं असेल? काही वाद तर नाही ना?

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि खिलाडी अक्षय कुमार या दोघांनी देखील गेल्या तीन दशकात प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय.शाहरुखने आपल्या रोमॅण्टिक अंदाजात तरुणींना घायाळ केलं तर खिलाडी कुमारने आपल्या जबरदस्त अ‍ॅक्शनने तरुणींसोबतच लाखो प्रेक्षकांला इंप्रेस केलं. परत या पुढच्या चित्रपटात दोघेही पुन्हा दिसतीय याची शक्यता कमीच आहे.

या मागे काही खास कारण आहे. शारुखने एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता.मुलाखतीत शाहरुख म्हणाला ” मी यात काय करू शकतो. अक्षय कुमार खूप लवकर उठतो. तितक्या लवकर उठणं मला शक्य नाही. जेव्हा माझ्या झोपण्याची वेळ होते तेव्हा त्याची पहाट उजाडलेली असते आणि तो उठतो. त्याचा दिवस खूप लवकरच सुरू होतो. जेव्हा मी काम करायला सुरुवात करणार असतो तेव्हा त्याची बॅग पॅक करून तो घरी जाण्याच्या तयारीत असतो. मी थोडा वेगळा आहे. तुम्हाला माझ्या सारखे लोक कमीच आढळतील जे रात्री उशीरापर्यंत शूटिंग करणं पसंत करतात.” असं म्हणत शाहरुखने अक्षयसोबत काम करणं तसं कठीण असल्याचं म्हंटलं होतं.

कारण काही असले तरी ‘दिल तो पागल है’हा चित्रपट शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वात गाजलेला सिनेमा ठरला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अदर पूनावाला लंडनहून भारतात परतले

राज्यातील आशा वर्कर्स यांचा संप संपला