in

राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर बॉम्ब हल्ला, प्रकृती स्थिर

पश्चिम बंगालमध्ये राज्यमंत्र्यांवर बॉम्बहल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यमंत्री झाकीर हुसेन यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे डझनभर कार्यकर्ते हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मुर्शीदाबाद जिल्ह्यातील निमतिया रेल्वे स्टेशनवर हा हल्ला करण्यात आला. अज्ञातांनी झाकीर हुसेन आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने बॉम्ब फेकले.

पश्चिम बंगालचे मंत्री जाकिर हुसेन आणि त्यांचे काही समर्थक बुधवारी (१७ फेब्रुवारी) रात्री मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाकडे जात होते. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी क्रूड बॉम्ब हल्ला केला. राज्यमंत्री जाकिर हुसेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असुन प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे .तसेच इतर जखमींनाही मेडिकल कॉलेज व रुग्णालयात नेण्यात आले आहे. राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर कोणी हल्ला केला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
जिल्ह्यातील गायींच्या तस्करी आणि भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे मंत्र्यावर हल्ला झाला.

या कामांमध्ये सामील झालेल्या लोकांना त्यांनी विरोध केला होता. त्यांना आज लक्ष्य केले जाण्याचे हेच कारण असू शकते. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती राज्यात सर्वकाळच्या नीचांकावर गेली आहे. असे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व बेरहमपूर लोकसभा खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. तर ही घटना राज्यात कायदा व सुव्यवस्था नसल्याचा पुरावा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आणखी किती वर्षे टोलवसुली चालणार?; हायकोर्टाचा सरकारला सवाल

राज्यातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण