in

“अनाथ मुलांसाठी दोन्ही सरकारने परस्पर सामंजस्याने काम करावे”

कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. कृपया,याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टि्वटरद्वारे केली.


कोरोनाच्या विषाणूंमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.अनेक मुलांच्या डोक्यावरचे माता-पित्यांचे छत्र नष्ट झाले आहे.घरातील कमावत्या पालकाचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे अनेक मुलांच्या भविष्याचा प्रश्न देखील प्रकर्षाने पुढे आला आहे. त्यांचे शिक्षण, आरोग्य आदीची काळजी घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता असून केंद्र व राज्यांनी परस्पर सामंजस्याने व गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. मुलं देशाचे भविष्य असतात. त्यामुळे त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम आपल्याला करावेच लागणार आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी देखील आहे, याचे स्मरण सुप्रिया सुळे यांनी करून दिले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जम्मू-काश्मीर लहान मुलीचा व्हीडिओ व्हायरल, होमवर्कविरोधात थेट पंतप्रधानांनाच केली तक्रार

COVID 19 | अखेर परदेशी लसींचा देशात वापर करण्यास मंजुरी