in

कौटुंबिक वादातून मुलाने घातली वडीलांच्या डोक्यात पार

संजय देसाई, सांगली | मिरजमध्ये कौटुंबिक वादातून मुलाने वडीलाच्या डोक्यात पार घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरज कुपवाड रोड होमगार्ड प्रशिक्षक केंद्र जवळ ही घटना घडली आहे.किसन जोतिराम माने वय 50 असे मृत वडीलाचे नाव असून आरोपी मुलगा पळून गेला आहे.

किसन ह्यांची पत्नी शेळ्याना फिरविण्यासाठी गेल्या होत्या.त्या परत आल्यानंतर त्यांना दरवाज्या समोर पडलेला  पतीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी मुलगा हा पळून जाताना दिसल्याचे सांगितले. मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर  मिरज गांधी चौकी पोलीस ठाणे रविराज फडणीस यांनी  घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून खुनातील पार हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपी विजय माने हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.घरात मयत किसन माने त्यांची पत्नी  मुलगा विजय हे तिघेच राहत होते.खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही.पण कौटुंबिक वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे तर विजय माने यांचा शोध घेण्यासाठी शोध पथके रवाना केले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधीक्षक अशोक वीरकर यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आमदार राजू नवघरेंकडून गंभीर चूक; ‘त्या’ कृतीवर म्हणाले…

DC vs KKR | केकेआरसमोर केवळ 136 धावांचे आव्हान