पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चांगलीच झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याचाच सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे. गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये ( सातत्याने वाढ होत आहे. मात्र आज पेट्रोल डिझेलच्या दरात कुठलेही बदल झालेले नाहीत. तरीही सध्या जास्तच आहेत. अनेक भागांमध्ये शंभरच्या पार इंधन पोहोचलं आहे.
गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावलेले आहेत. गेल्या 12 दिवसात पेट्रोल 3.28 रुपयांनी महागलं आहे. राजस्थानमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. तर भोपाळमध्येही पेट्रोलचे दर 101.51 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर डिझेल गेल्या 12 दिवसात 3.49 रुपयांनी महाग झाले आहे.
पेट्रोलचे दर
मुंबई 97.00 रुपये प्रति लिटर
नवी दिल्ली 90.58 रुपये प्रति लिटर
चेन्नई 92.59 रुपये प्रति लिटर
कोलकाता 91.78 रुपये प्रति लिटर
नोएडा 88.92 रुपये प्रति लिटर
डिझेलचे भाव
मुंबई 88.06 रुपये प्रति लिटर
नवी दिल्ली 80.97 रुपये प्रति लिटर
चेन्नई 85.98 रुपये प्रति लिटर
कोलकाता 84.56 रुपये प्रति लिटर
नोएडा 81.41 रुपये प्रति लिटर
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.
Comments
Loading…