देशात सध्या इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. त्याचपार्श्वभूमीवर राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा , इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य प्रचंड त्रस्त असून यावरुन विरोधक मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान शिवसेनेने तर राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा अशा शब्दांत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सामना संपादकीयमधून शिवसेनेने टीका केली असून त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील असा टोलाही लगावला आहे.
लोकांना जगण्याचा हक्क आहे व त्यातही जीवनावश्यक गोष्टींचे भाव नियंत्रित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य ठरते “तिकडे केंद्रातील भाजप सरकार ‘सोनार बंगला’ घडविण्यासाठी कोलकात्यात तळ ठोकून बसले आहे आणि देशाला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने होरपळून टाकले आहे. या महागाईवर सरकार पक्ष मूग गिळून गप्प बसला आहे. एरवी महाराष्ट्रात ऊठसूट आंदोलने करणारा भाजपनामक विरोधी पक्ष पेट्रोल-डिझेल दरवाढीवर गप्प का बसला आहे?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.
“पेट्रोलने शंभरी गाठली याचा उत्सव भाजपाई मंडळींनी करायला हवा, पण या ‘शंभरीपार’चे श्रेय मात्र प्रिय मोदीजी काँग्रेसला द्यायला तयार झाले आहेत. ‘‘आधीच्या सरकारांनी देशाचे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी केले असते तर मध्यमवर्गीयांवर महागाईचा भार पडला नसता’’, हे मोदी यांचे वक्तव्य म्हणजे त्यांच्या बोलघेवडेपणास साष्टांग दंडवत घालावे असेच आहे. आधीच्या सरकारांनी इंडियन ऑइल, ओएनजीसी, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, मुंबई हायसारखे सार्वजनिक उपक्रम सुरू केले.
Comments
Loading…