in

Budget 2021 : निवडणुका झालेल्या चार राज्यांवर अर्थकृपा

लोकशाही न्यूज नेटवर्क

1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये कृपा झालेल्या चार राज्यांना घसघशीत माप मिळाले आहे. तमिळनाडू, आसाम, केरळ, पश्चिम बंगाल या चार राज्यांना अर्थसंकल्पात 2.27 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तमिळनाडूला पायाभूत सुविधांसाठी 1.03 लाख कोटी, केरळला रस्त्ते आणि महामार्गासाठी 65 हजार कोटी तर पश्चिम बंगालला 25 हजार रुपये व आसामला 34 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

या राज्यांवर झाली अर्थसंकल्पात कृपा

केरळ – केरळ मध्ये रस्ते आणि महामार्गसाठी 65 हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे तर 1600 किलोमीटरचा मुंबई कन्याकुमारी कॉरिडोरला मान्यता देण्यात आली आहे

पश्चिम बंगाल – पश्चिम बंगालमध्ये 675 किलोमीटरच्या महामार्ग बांधण्यासाठी 25 हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे

तमिळनाडू – तमिळनाडूमध्ये 3,500 किलोमीटरच्या महामार्गासाठी 1.03 लाख कोटी खर्च करण्यात येणार आहेत

आसाम – आसाम मध्ये 1, 300 किलोमीटर महामार्गासाठी 34 हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देशात कोरोनाचे आणखी 11 हजार 427 जण कोरोनाबाधित

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांचीच फसवणूक केली – चिदंबरम