in

अर्थसंकल्पीय अधिवेशन |केंद्राकडून 29 हजार कोटी GST परतावा बाकी – राज्यपाल

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेनशाला सुरुवात झालेली असून यावेळी अनेक मुद्द्यांवर विरोधक राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अभिभाषण मराठीतून केले. याआधी देखील त्यांनी मराठीतूनच अभिभाषण केले आहे. त्यावेळी राज्यपालांनी माझे शासन कर्नाटक महाराष्ट्र वादाबाबत सुप्रीम कोर्टात ठाम भूमिका मांडत आहे. मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी काम करत असल्याचं सांगितलं. तसंच राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना, मदत यांचाही उल्लेख केला. तसेच 29 हजार 290 कोटी रुपयांची GST ची भरपाई केंद्राकडून येणं बाकी आहे.

राज्यपालांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत आपल्या अभिभाषणाला सुरुवात केली. “धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनानं प्रभावी काम केलं. राज्य सरकारनं करोनासंदर्भात मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कोरोना चाचणी साठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या आहेत,” अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.

“माझं कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला. कोरोनाविरोधातील लढाई सुरु असून राज्य सरकारनं मी जबाबदार ही योजना सुरु केली,” असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. “कोरोनासंदर्भातील आरोग्य उपाययोजना वाढवण्याची गरज आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं आपल्याला काळजी घेण्याची गरज,” असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारकडून राज्याला उपलब्ध झालेल्या तसंच शिल्लक असलेल्या वस्तू वसेवा कराच्या परताव्याची माहिती देण्यात आली. राज्य सरकारने २६ जानेवारी २०२० ला शिवभोजन योजना सुरु केली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राणा दग्गुबातीचा ‘हाथी मेरे साथी’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

अमिताभ बच्चन यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी