in

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आमदार संदीप क्षीरसागरांची बुलेट रॅली

Bullet rally of MLA Sandeep Kshirsagar on the backdrop of Maharashtra Bandh

बीड : विकास माने | बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात रॅली काढून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी स्वतः क्षीरसागर यांनी बुलेट चालवून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रॅलीला सुरुवात करून साठे चौक, जालना रोड, सुभाष रोड मार्गे या रॅलीचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर समारोप करण्यात आला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांसोबत असून वेळप्रसंगी भाजप सरकारविरोधात यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पूँछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, 5 भारतीय जवान शहीद

देवेंद्र फडणवीसांचा ढोंगीपणा जनतेसमोर – नाना पटोले