in

वेळेवर पगार न झाल्याने बस चालकाची आत्महत्या

विकास माने, बीड | बीड आगारातील कर्मचा-याचा पगार वेळेवर न झाल्याने चिंताग्रस्त बस चालकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडलीय. वाहन चालक तुकाराम सानप असं या चालकाचे नाव आहे. या घटनेवरून बस कर्मचारी आक्रमक झाले असून काम करुन सुद्धा कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसतील तर संबंधित मंञी आणि अधिकार्यांवर गुन्हे नोंद करा अशी मागणी होत आहे.

बीड आगारातील वाहन चालक तुकाराम सानप सोमवारी दिवसभर नियोजनानुसार बसच्या फेऱ्या केल्या होत्या. घरी गेल्यानंतर त्यांनी बीड शहरातील अंकुश नगर इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नियमानुसार बस कर्मचाऱ्यांचा पगार ७ तारखेपर्यंत होत असतो परंतु या महिन्यात अजून सुद्धा पगार झालेला नाही. यामुळे सध्या बस स्थानकातील कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आलीय.

मयत तुकाराम सानप यांच्या घरची लाईट गेल्या १५ दिवसापुर्वी कट केली होती. त्या बरोबरच घरातील किराणा संपला होता, यासह इतर कारणांमुळे तुकाराम सानप यांनी आत्महत्या केलीय. काम करुन सुद्धा कर्मचाऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नसतील तर संबंधित मंञी आणि अधिकार्यांवर गुन्हे नोंद करा अशी मागणी बस कर्मचारी करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राकेश झुनझुनवालांच्या ‘आकासा एअरलाईन्स’ला सरकारची NOC

साईसंस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांना हायकोर्टाची नोटीस!