in

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर : शेतात काम करत असताना वाघाने हल्ला करून शेतकऱ्याला ठार केल्याची घटना हरणी गावातील, काजलसार बीटातील ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात घडली आहे. शामराव डोमाजी नन्नावरे (६०) असे मृतकाचे नाव ते असून हरणी गावातील रहिवाशी आहे.

या वर्ष भरात २३ जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळी पोहचले. शेतीचा हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, तात्काळ वाघाचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देशभरात मागील २४ तासांत ५७ हजार ९४४ रूग्ण कोरोनामुक्त

मुंबई गोवा मार्गावर अपघात