in ,

सीएच्या विद्यार्थ्याला सट्टेबाजी करताना अटक

लॉकडाउनमध्ये बेरोजगार झालेला सीएचा विद्यार्थी क्रिकेटची सट्टेबाजी चालवत असताना नागपूर पोलिसांच्या हाती लागला आहे. नागपूरमध्ये धरमपेठ येथील खरे टाऊन मधील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या या अड्ड्यावर छापा मारून नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातील निवासी २४ वर्षीय शुभम यास अटक केली आहे. सीएचा विद्यार्थी अशाप्रकारे क्रिकेटच्या सट्टामध्ये हाती लागण्याची ही पहिलीच घटना आहे. खरं टाऊन नागपूर मधील सदाशिव अपार्टमेंटमध्ये शुभम भाड्याने राहत असून त्याचे वडील शेतकरी तर आई शिक्षिका आहे.

बीकॉम प्रशिक्षणानंतर शुभम नागपूरला आला होता. एका मित्राबरोबर तो राहत होता. त्याच्या मित्राला सट्टेबाजी बाबत माहिती होती शुभमने त्याच्या कडून ही माहिती घेतली. पॉकेटमनीसाठी शुभम लहान-मोठे काम करत होता. सीएमध्ये प्रवेश घेतल्यानंतर लॉकडाउन लागले आणि तो बेरोजगार झाला. फ्लॅटचे भाडे आणि दुसरे खर्च करण्यासाठी अडचण होऊ लागल्याने त्याने क्रिकेट सत्तेबाजी सुरू केली. याची माहीती पोलीस विभागाला लागल्यानंतर पोलिसांकडून याठिकाणी धाड टाकण्यात आली आणि पोलिसांनी त्याला रंगे हाथ पकडले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0
Transgender Marriage

Transgender Marriage | एका लग्नाची दुसरी गोष्ट…

Mansukh Hiren Murder : एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना 28 जून पर्यंत कोठडी