in

‘CAA, NRC मागे घ्या नाहीतर उत्तर प्रदेशचे रस्ते शाहीन बागेत बदलू’

कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केल्यानंरही विरोधक आणि शेतकरी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. एमएसपीच्या हमीशिवाय ते मान्य करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. दुसरीकडे एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जर एनपीआर आणि एनआरसी कायदे कृषी कायद्याप्रमाणे रद्द केले नाहीत तर ते बाराबंकीला आणखी एक शाहीन बाग बनवतील असा इशारा ओवेसींनी दिला आहे.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “मी पंतप्रधान मोदी आणि भाजपाला कृषी कायद्यासारखे CAA मागे घेण्याचे आवाहन करतो कारण ते संविधानाच्या विरोधात आहे. जर त्यांनी एनपीआर आणि एनआरसी वर कायदा केला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि इथे आणखी एक शाहीन बाग बांधली जाईल,” असे ओवेसींनी म्हटले.

दिल्लीतील शाहीन बाग हे सीएए आणि एनआरसीच्या विरोधाचे केंद्र होते. २०२०च्या सुरुवातीला कोविड -१९मुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सीएए विरुद्धच्या आंदोलनासाठी शेकडो महिलांनी अनेक महिने तळ ठोकलेल्या निषेध स्थळाची जागा रिकामी केली होती. ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही हल्ला चढवला. “पंतप्रधान मोदी हे देशातील सर्वात मोठे ‘नौटंकीबाज’ आहेत आणि चुकून ते राजकारणात आले आहेत, नाहीतर चित्रपटसृष्टीतील लोकांचे काय झाले असते. सर्व पुरस्कार मोदींनी जिंकले असते,” असे ओवेसी म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हमीभाव कायदा हवाच; आंदोलक शेतकऱ्यांचं पंतप्रधानांना पत्र

शिवसेना जिल्हा प्रमुखाला गुटखा प्रकरण भोवलं; जिल्हा प्रमुख पदाला स्थगिती