in

राज्य सरकारचा मोठा निर्णय! कॉलेज सुरु करण्याचे वेळापत्रक महिनाभर पुढे ढकलले

राज्यातील कॉलेज सुरु करण्याचे वेळापत्रक 1 महिना पुढे ढकलण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. कोविडमुळे हे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक म्हणजेच कॉलेज सुरु होण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केलेली आहे. मात्र, या अधिनियमात निर्देशित केल्याप्रमाणे कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ शकणार नाही. याच कारणामुळे हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणीचा काँग्रेसमध्ये प्रवेश

MPSC Result: राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर