in

सीआयडीचे दिग्दर्शक बिजेंद्र सिंग विरोधात तक्रार; अटक न केल्याने कॅनेडियन महिलेने पोलीस ठाण्यातच मांडले ठाण

मुंबईच्या डी. एन. नगर पोलिस ठाण्यात पती व सावत्र मुलाविरोधात कॅनेडियन महिलेने तक्रार दाखल केली आहे. या घटनेत तक्रार दाखल करून सुद्धा आरोपींना अटक करण्यात न आल्याने पोलीस ठाण्यात आज महिलेने न्यायासाठी ठाण मांडला आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध सिरीयल दिग्दर्शक बिजेंद्र सिंग व अक्षय सिंग यांच्या विरोधातहि तक्रार दाखल आहे. त्यामुळे या घटनेत आरोपींना अटक का करत नाही आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

परदेशी कॅनेडियन महिला हि सीआयडी (CID) या प्रसिद्ध सिरीयलचे दिग्दर्शक बिजेंद्र सिंग यांची पत्नी आहे. या लग्नाला मुलगा अक्षय सिंग याचा विरोध होता. याचाच राग मनात ठेवून तो परदेशी कॅनेडियन सावत्र आईचा लैगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. सुरुवातीला परदेशी कॅनेडियन महिलेने या प्रकरणाची वाच्चता कुठेही केली नाही. मात्र पती परदेशी गेल्यावर तिचे लैगिक शोषण आणखीन वाढल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच सावत्र मुलाने आणि पतीने मिळून तिचा पासपोर्ट, 68 लाख 50 हजार किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, 16 लाख 10 हजार किंमतीची महागडी घड्याळे चोरी केल्याचा आरोप करत तिने प्रसिद्ध दिग्दर्शक बिजेंद्र सिंग, अक्षय सिंग यासह दोन साथीदारांविरोधात डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

हि तक्रार करून तीन महिने उलटून गेले आहेत मात्र अद्याप आरोपींना अटक झाली नाही आहे. त्यामुळे परदेशी महिलेने आज थेट डी. एन. नगर पोलिस ठाण्यातच ठाण मांडला आहे. जिथ पर्यत न्याय मिळत नाही तिथपर्यत पोलीस ठाण्यातच बसून राहण्याचा निर्धार तिने केला आहे.

दरम्यान या घटने संदर्भात डी एन नगर पोलिसांशी लोकशाही न्यूजने संपर्क साधला असता या प्रकरणात पोलीस तांत्रिक तपास करत असल्याचे डी. एन. नगर पोलिसांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

प्रसिद्ध युट्युबर भुवन बामच्या आई-वडिलांचे कोरोनाने निधन