in

शाळा वाचवण्यासाठी भंडाऱ्यात कॅन्डल मार्च

‘शाळा वाचवा, भंडारा वाचवा ‘ हा नारा घेऊन मनरो शाळा बचाव समितीच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला.

भंडारा शहरातील इंग्रजकालीन लाल बहाद्दुर शास्त्री विद्यालय परिसरात भंडारा जिल्हा परिषदेतर्फे गाळ्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले असून त्याला शाळेच्या आजी-माजी विद्यार्थी तसेच शहरातील काही पक्ष व सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवित सदर बांधकाम रद्द करण्याची मागणीला घेऊन कॅन्डल मार्च काढण्यात आला.

या शाळेचे माजी विद्यार्थी असलेले डॉक्टर, वकील, इंजीनियर आदी व्यक्ती कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी शास्त्री विद्यालय ते गांधी चौकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावतीत डेंग्यूचे तांडव; तिवसामध्ये सहा दिवसात तीन बालकांचा मृत्यू

पावसामुळे झाड कोसळलं महामार्गावर, चारचाकीही झाडाला आदळल्या