in

भाविकांना कारने चिरडले; तीन ठार

संजय देसाई, सांगली
सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील प्रसिध्द असणाऱ्या महालिंगराया यात्रेसाठी पायी चालत जाणाऱ्या कर्नाटकातील भाविकांना खासगी चार चाकी वाहनाने चिरडले. कारचा टायर फुटून चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटले. या अपघातात तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे. यात बसवराज दुर्गाप्पा चिंचवडे, नागप्‍पा सोमांना, म्हणप्पा दुर्गप्पा गोंदीकल असे मृत्यू झालेल्या तिघा भाविकांची नावे आहेत.

सध्या हुलजंती तालुका मंगळवेढा येथील दीपावलीच्या निमित्ताने महालिंगराया यात्रा मोठ्या प्रमाणात भरते या यात्रेसाठी कर्नाटकातील लोक मोठ्या प्रमाणात येत असतात. या यात्रेसाठी कर्नाटकातील रायचूर येथून भाविक पायी चालत निघाले होते. पंढरपूर ते विजयपूर मार्गावरील शेवाळे वस्ती जवळ पुण्याहून पोलो या चार चाकी वाहनाने वाहन क्रमांक एम एच 12-8598 या गाडीचा टायर फुटला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सातारकर धावले उत्साहात