in

Job Updates : रिझर्व्ह बँकेत भरती

जर तुम्ही 10 वी पास असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑफिस अटेंडंटच्या शेकडो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन rbi.org.in या संकेतस्थळावर 25 मार्च 2021 पूर्वी अर्ज करावयाचा आहे. उमेदवाराचे वय सर्वसाधारण वर्गासाठी 18 ते 25 वर्षे असावे, तसेच आरक्षित प्रवर्गांसाठी शासकीय नियमानुसार कमाल वयोमर्यादेत शिथिलता असेल. एकूण पदांची संख्या 841 असून पे स्केल रु. 10,940/- ते 23,700/- मासिक अधिक अन्य भत्ते असेल.

  • पे स्केल – १०,९४० रुपये ते २३,७०० रुपये मासिक (यासह अन्य भत्त्यांसह मिळेल पगार)
  • पात्रता – मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य. वय १८ ते २५ पर्यंत असावे. आरक्षित प्रवर्गांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल..
  • अर्ज शुल्क – जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएससाठी ४५० रुपये। एससी, एसटी, दिव्यांग व माजी कर्मचाऱ्यांना ५० रुपये। आरबीआय ची वेबसाइट rbi.org.in द्वारे अर्ज करायचा आहे. थेट लिंक पुढे दिली आहे.

महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज सुरू – २४ फरवरी २०२१
ऑनलाइन अर्जांची मुदत- २५ मार्च २०२१
परीक्षा की तारीख – ९ आणि १० एप्रिल २०२१

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra budget session | “पाठ थोपटून घ्यायलाही काम करणारी छाती हवी”

WhatsApp Web साठी नवीन फिचर लाँच