लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात उद्या शनिवारपासून कार्निव्हलला आरंभ होत आहे. यावेळी कोविडमुळे फक्त पणजी व मडगाव शहरातच कार्निव्हल होणार आहे. बक्षिसे व साधनसुविधा मिळून कार्निव्हलवर एकूण ५४ लाख ७० हजार रुपयांचा खर्च होणार आहे. कांदोळी येथील अेरिक डायस हे यावेळी किंग मोमोच्या भूमिकेत आहेत. कोविड एसओपीचे पालन करूनच कार्निव्हल साजरा केला जाईल, असे पर्यटन खात्याने शुक्रवारी येथे जाहीर केले.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी किंग मोमो डायस याच्यासोबत येथे पत्रकार परिषद घेतली. जर आम्ही कार्निव्हल व शिगमोत्सव साजरा केला नाही तर पर्यटन उद्योग क्षेत्रात गोवा राज्य मागे पडेल. केरळ व अन्य राज्ये पुढे जातील. कार्निव्हलचे मोठे आकर्षण देशभरातील पर्यटकांना आहे. त्यामुळेच पणजी व मडगाव अशा दोन ठिकाणी यावेळी आम्ही कार्निव्हल आयोजित करत असल्याचे आजगावकर यांनी स्पष्ट केले.
Comments
Loading…