in

मुंबईतील ब्लॅक आऊट हा सायबर हल्ला नव्हे, निव्वळ मानवी चूक, केंद्र सरकारचा दावा

सायबर हल्ल्यामुळे मुंबईतील ब्लॅक आऊट झाला नसून मानवी चूक असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. 12 ऑक्टोबरला मुंबईची वीज काही तासांसाठी गेली होती. संपूर्ण मुंबईमध्ये ब्लॅकआउट झाला होता. हा ब्लॅकआऊट काही तांत्रिक कारणामुळे नाही, तर सायबर हल्ल्यामुळे झाल्याची शक्यता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कालच (1 मार्च) वर्तवली होती.

मागील वर्षी 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या ब्लॅक आऊट घटनेमागे चीनचा हात असल्याचा दावा अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल, प्राथमिक माहितीनुसार मुंबईवर सायबर हल्ल्याचे संकेत नाकारता येत नाही, असे सांगितले होते. मात्र केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह ही शक्यता फेटाळून लावली आहे.

या घटनेची दोन पथकांमार्फत तपास करण्यात आला. या ब्लॅकआऊटमागे घातपात नसून मानवी चूक असल्याची अहवाल या पथकांनी दिला आहे. यापैकी एका टीमने सायबर हल्ला झाल्याचे म्हटले असले तरी, त्याचा मुंबईतील ब्लॅकआऊटशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे आर. के. सिंह म्हणाले. उत्तर आणि दक्षिण क्षेत्रातील वीजवितरण केंद्रांवर सायबर हल्ला झाला, पण ऑपरेटिंग सिस्टीमपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत, असे या टीमने आपल्या अहवालात म्हटले आहे.

या हल्ल्यामागे चीन असल्याचा दावा केला जात आहे. मात्र त्यामागे नक्की कोण आहे, ते सांगता येणार नाही. यामागे चीन किंवा पाकिस्तान आहे, असे ठामपणे म्हणता येणार नाही. चीन तर नक्कीच इन्कार करेल, असेही आर. के. सिंह म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ICC Player of the Month Award; आयसीसीच्या नामांकनात रविचंद्रन अश्विनचे नाव

‘त्याला’ बलात्कार म्हणता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा