in

केंद्र सरकारचा ट्विटरला इशारा, अन्यथा परिणामांना तयार राहा

केंद्र सरकाने समाजमाध्यम क्षेत्रात लोकप्रिय असणाऱ्या ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, अशा कंपन्यांसाठी नवीन नियमावली जाहीर केली असून नियमावलीमधील तरतुदींचं पालन करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देखील दिली. २६ मे पासून संपूर्ण देशात नवी नियमावली लागू करण्यात आली. मात्र  ट्विटरने अजूनही या नियमावलीनुसार अंमलबजावणी केली नसल्यामुळे आता केंद्र सरकारने ट्विटरला शेवटचा इशारा दिला आहे.

वारंवार सांगून देखील आपल्या धैय धोरणात बदल न केल्यामुळे या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. केंद्र सरकारने सांगितलेल्या धोरणाची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा देखील केंद्र सरकारने नोटिशीमध्ये दिला आहे. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘या’ दिग्दर्शकासोबत अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाहबंधनात

Monsoon Updates | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून महाराष्ट्रात दाखल