in

तागडी, तराजू नाही, आम्ही तलवार, बंदुका घेऊन लढणारे लढवय्ये; संजय राऊतांचा घणाघात

102व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून आज राज्यसभेत चर्चा झाली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. आम्ही तलवार आणि बंदुका घेऊन लढत आलो आहोत. तागडी आणि तराजू कधीच आमच्या हातात आलं नाही, असे राऊत म्हणाले.

आज संसदेत घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत सहभाग घेताना संजय राऊत यांनी शाहू महाराजांनी सर्वात पहिलं आरक्षण दिलं. सामाजिक न्यायासाठी 119 वर्षापूर्वी त्यांनी आरक्षण दिलं. 50 टक्के आरक्षण दिलं. आरक्षण देणारा राजा महाराष्ट्राचा होता. मराठा होता. आज मराठा समाज रस्त्यावरून आंदोलन करत आहे. हे या देशाचं दुर्देव आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आरक्षणाचा हा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

तुम्ही आणलेलं बिल अर्धवट आहे. जोपर्यंत 50 टक्क्यांची मर्यादा हटवली जात नाही. तोपर्यंत फायदा नाही. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ही 30 वर्षांपासूनची आहे. त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही ही मर्यादा वाढवली पाहिजे. तुम्ही आता दुरुस्ती कराल, काही बदल कराल, त्याने काही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला 50 टक्क्यांची मर्यादा हटवलीच पाहिजे, असं राऊत म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs ENG 2nd Test: दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात बदल

“तुमची इयता कंची”?- आशिष शेलार