in

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत


ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत रेल्वे स्थानकावर उभे रहावे लागत आहे. तसेच स्थानकावर प्रवाशांची गर्दी जमतेय. दरम्यान 15 ते 20 मिनिटात वाहतूक सुरळीत होण्याची प्राथमिक माहिती आहे.

मध्य रेल्वेच्या आटगाव स्टेशन दरम्यान मेलचा इंजिन फेल झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कसारा दिशेकडील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे प्रवाशांची ऐन गर्दीच्या वेळी गैरसोय झाली आहे. तसेच रेल्वेने सामान्य प्रवाशांसाठी घालून दिलेल्या नियमांमुळे प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.दरम्यान सध्या वाहतूक विस्कळीत असून लवकरात लवकर रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा रेल्वे प्रयत्न करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

स्वराज्याची राजधानी सजली रोषणाईने

50 हजार पणत्यांपासून साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे मोझॅक पोट्रेट!