in

चाळीसगावमध्ये भाजपा खासदारांसह आजी-माजी आमदारांवर गुन्हा दाखल

मंगेश जोशी, जळगाव | जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे भाजपा खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह 5 हजार नागरिकांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा आगमन सोहळ्या प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशाचे उल्लंघन करून सोशल डिस्टंन्स न पाळणे, मास्क न वापरल्या प्रकरणी व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह 5 हजार नागरिकांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भिवंडीला पाणीपुरवठा करणाऱ्या वऱ्हाळ तलावावर हिरवा तवंग; दुर्गंधीमुळे नागरीक हैराण

Anant Geete | रायगडमधील गुप्त बैठक संपली; सेना-राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल