‘आगामी १५ दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील आणखी २ मंत्र्यांचे राजीनामे होतील’, असं भाकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आतापर्यंत संजय राठोड, त्यांनतर गृहमंत्री अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे वाचले. मात्र, येत्या १५ दिवसात आणखी २ मंत्र्यांचे राजीनामे होतील, असा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला.
अनिल परब इतका त्रागा कशासाठी करत आहेत, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यापेक्षा चौकशीला सामोरे जा, असं आवाहनही पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, सीबीआय चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून अनिल देशमुखांना राजीनामा दिलं असं सांगितलं. मग सुप्रिम कोर्टात चौकशी करू नका, यासाठी याचिका का दाखल केली. ही संघटित गुन्हेगारी आहे. सर्वसामान्य माणसाला जो न्याय तोच सर्वांना हवा, असंही पाटील म्हणाले. कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी झालं आहे. यावरुन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीही चांगलंच झापलं आहे, असंही पाटील म्हणाले.
राष्ट्रपती राजवट –
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू नये अशी भाजपची मागणी आहे. मात्र, राष्ट्रपती राजवटी लागण्यासाठी आणखी कशाची गरज असते, हे आम्हाला तज्ज्ञांनी सांगावं, असं पाटील म्हणाले. राष्ट्रपती राजवट लागण्यासारखी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे, असंही पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची अप्रत्यक्षपणे मागणीच केली आहे.
Comments
Loading…