‘ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी विकासाऐवजी भानगडीच केल्या’, चंद्रकांत पाटीलांची टीका
लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यातील पूजा चव्हाणच्या आत्महत्येचा विषय चांगलाच तापत चालला आहे. सध्या या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याचं नाव सध्या झळकत आहे. मंत्र्यांचे तरुणीसोबत अनैतिक प्रेम संबंध होते आणि त्यांनी विश्वासघात केल्यामुळे तरुणीने आत्महत्या केली अशी माहिती येत आहे. या सर्व प्रकरणात विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
‘महाभकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळालीच नाही, तर उलट या काळात सरकामधील अनेक मंत्र्यांच्या भानगडी जनतेसमोर उघड झाल्या आहे. आघाडीच्या या ऑटोरिक्षा सरकारच्या तीन चाकात अनेक छिद्रे पडली असून हे सरकार म्हणजे पंक्चर सरकार आहे,’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
‘ठाकरे सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच एका कथित प्रेयसीने बलात्काराचे आरोप केले आणि त्यांनीच स्वतः आपले अनैतिक संबंध आणि मुलं असल्याच्या भानगडीची कुबली दिली. संपूर्ण राज्यात या मुद्द्यावर निदर्शने झाली तरीही त्या भानगडीबाज मंत्र्यांनी अद्यापही राजीनामा दिला नाही. पण याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर निर्णय घेऊ असे सांगत महाविकास आघाडीमधील जाणता राजाने त्या मंत्र्यांना वा त्याच्या कथिक कृत्यांना पाठीशी घातलं,’ असा आरोपही पाटील यांनी केला आहे.
Comments
Loading…