हे राज्य तुमच्या घरचे नव्हे तर कायद्याचे आहे, असे म्हणत लोकशाहीचे नव्हे तर ठोकशाहीचे राज्य असल्याचा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. त्यामुळे जनता आता मतदानाची वाट बघत असून भ्रमात न राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
जनतेने तुम्हाला सत्ता दिली नव्हती. जनतेच्या मतांचा अनादर करून सुम्ही सत्तेत बसल्याने येणाऱ्या निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, अशी टीका त्यांनी केलीय. राज्यातील नामांकित व्यक्तींना गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविण्यात येत आहे. देशद्रोहाचे काम करणाऱ्या पूर्ण संरक्षण देण्याचे कामही हे सरकार करत आहे. अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर लता मंगेशकर यांनाही गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत आहेत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
खासदार उदयनराजेंसोबत पाहाणी केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी भाजपाचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Loading…