in

‘बेळगाव झांकी आहे, पण मुंबई अभी बाकी है’, चंद्रकांत पाटलांचं थेट आव्हान

बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपनं बाजी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप व्यक्त केला होता. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, असा ट्रेंड सोशल मीडियावर सूरू आहे.यावर पाटील यांनी बोलताना, ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे’ हे तर नक्कीच आहे आणि ती सोडणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी शिवसेनेला दिला आहे. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही म्हटलं होतं. दोन का एक नगरसेवकावरुन थेट आम्ही 51 वर गेलो. तेव्हा आम्ही म्हणलं की ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार, असं थेट आव्हानच पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे.

बेळगावात मराठी माणसाचा पराभवानंतर पेढे वाटले जात आहेत. या संजय राऊतांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना बेळगावात भाजपचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यात निम्म्यापेक्षा जास्त मराठी भाषिकच असल्याचं पाटील यांनी आवर्जुन सांगितलं.

‘ज्या ज्या वेळेला रिझल्ट चांगले असतात, त्यावेळेला ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्या वेळी निकाल त्यांच्या विरोधात लागतात तेव्हा ईव्हीएममध्ये त्यांना घोटाळा वाटतो. हे त्यांच्या आणि विरोधकांच्या स्वभावानुसारच आहे’, असा टोला पाटील यांनी लगावलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तुम्हालाही जाणून घ्यायचा आहे का? ‘बेला चाओ’ या गाण्याचा अर्थ

IND vs ENG 4th Test Day 5 Live: भारत विजयापासून चार विकेट दूर