in , ,

‘तोंडास फेस, कोणाच्या? अग्रलेखावर, चंद्रकांत पाटलांचे संजय राउतांना प्रत्युत्तर

हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर शिवसेनेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टिकेला आता चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’ मधुन प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही मला सातत्याने भरपूर प्रसिद्धी मिळवून देता. राजकारणात प्रसिद्धी महत्त्वाची असते. ‘एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी’, असे राजकारणासाठी म्हणतात. तुम्ही माझ्यावर नियमित टीका करता आणि त्याची चर्चा मीडिया करते, मग मला आपसूक प्रसिद्धी मिळते.

आम्हाला संघात शिकवले जाते की, ‘अच्छा कर और कुएं मे डाल.’ म्हणजे चांगले काम करा आणि विसरून जा. त्यामुळे संघ ही जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना असूनही कोठेही प्रसिद्धीचा बडेजाव नसतो. माझ्यासारख्या संघ स्वयंसेवकाला हे प्रसिद्धीचे प्रकरण मोठे अवघड असते. पण संजय राऊत, तुम्ही माझ्यावर टीका करता आणि मला प्रसिद्धी मिळते. आता मी संघाचे नाही तर एका राजकीय पक्षाचे काम करतो. राजकारणात संघासारखी प्रसिद्धी असून चालत नाही. म्हणजे प्रसिद्धीकडे पाठ फिरवून चालत नाही. हो, जरा वेगळा शब्द वापरला की तुम्हाला अर्थ सांगावा लागतो. राजकारणात प्रसिद्धी तर हवीच. ती तुम्ही मला मिळवून देता म्हणून तुमचे आभार…

तुम्ही माझ्यावर या अग्रलेखात बरीच चिखलफेक केली आहे. पण तुम्हाला मी जाब देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही, अशा अर्थाने शब्द वापरला. नुकतेच मी एका नेत्याबद्दल पाठीत खंजीर खुपसला, असा वाक्प्रचार वापरला तर तुम्ही पाठीत खंजीर खुपसल्याचा पुरावा मागितला. पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे विश्वासघात करणे एवढाही अर्थ तुम्हाला संपादक असून माहिती नाही. त्यामुळे प्रोटोकॉल शब्द का वापरला हे सांगितले.

विशेष म्हणजे तुमच्या पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही आज हाच वाक्प्रचार वापरला. मी हा वाक्प्रचार वापरल्यानंतर तुमच्या पक्षातील लोकांचे धाडस वाढलेले दिसते, असं चंद्रकांत पाटील चक्क सामना अग्रलेखातून म्हणाले. त्याच पद्धतीने आज तुम्ही ‘तोंडास फेस, कोणाच्या ?’ या शीर्षकाचा अग्रलेख लिहून मला पुन्हा प्रसिद्धी मिळवून दिली आहे. आता मात्र तुमचे आभार मानलेच पाहिजेत असे वाटल्याने हे पत्र लिहिले. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona Update | राज्यात 3,131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात पुढील २८ तास सर्वत्र वादळी पाऊस, काही भागात यलो अलर्ट