in

‘चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वतःचं हसं करून घेऊ नये’, अनिल देशमुखांचा टोला

महाविकास आघाडी सरकार स्वत:चे अपयश झाकण्यासाठी चीनने सायबर हल्ला केल्याच्या बातम्या पसरवून जनतेला मूर्ख बनवत असल्याचा आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह अनिल देशमुख यांच्यावर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. या आरोपावर प्रत्युत्तर देताना अनिल देशमुखांनी बावनकुळेंना टोला लगावला.

१२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली ती केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे. मात्र, हे अपयश झाकण्यासाठी गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री नवीन शक्कल लढवत आहेत, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. या आरोपावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “मुंबई येथील वीज बंद प्रकरण हा तांत्रिक विषय आहे. हा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना समजू शकणार नाही. त्यांनी या विषयावर बोलून स्वतःचं हसं करून घेऊ नये.” असा टोला ट्विटद्वारे लगावला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेतकऱ्यांना पुरेशी वीज देण्याला प्राथमिकता, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ

विकासकांकडील बेस्टची थकबाकी वसूल करण्यासाठी लवादामार्फत प्रयत्न – मंत्री एकनाथ शिंदे