in

Google Pay मध्ये झालाय ‘हा’ मोठा बदल

लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाचा नारा दिला आणि भारतीयांचा अ‍ॅपद्वारे पैसे देण्याकडे जास्त कल निर्माण झाला. कोणाला पैसे पाठवायचे असतील तर Google Payने लगेचच आणि सोप्यापाठविले जात. परंतू या गुगल पे अ‍ॅपमध्ये मोठा बदल झाला आहे.डिजिटल वॉलेटसाठी भारतीयांचा Google Pay कडे जास्त ओढ आहे. परंतु आता गुगल पे अ‍ॅपमध्ये मोठा बदल झाला आहे.

Google Payच्या लोगोमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन अपडेटमध्ये हा बदल झाला आहे. काहींच्या मोबाईलवर अद्यापही जुने गुगल पे दिसत आहे. प्ले स्टोअरवरही त्यांना अपडेट आलेली नाही. मात्र, ज्यांना ही अपडेट आलीय त्यांना लोगो बदलाबरोबरच नावातही बदल झाल्याने मोबाईलमध्ये गुगल पे सुरुवातीला सापडत नाहीय.नवा लोगो हा 116.1.9 (Beta) व्हर्जनवर जारी करण्यात येणार होता. गुगल पेच्या नवीन लोगोमध्ये U आणि N इंटरलॉक केला आहे. हा लोगो 3D वाटतो. वेगवेगळी रंगसंगती यामध्ये वापरण्यात आली आहे. या नव्या लोगोत लाल, पिवळा, हिरवा आणि निळा रंग वापरण्यात आला आहे.

लोगो प्रमाणेच गुगल पे च्या नावामध्येसुद्धा बदल करण्यात आली आहे. Google Payचे दुसरे नाव Gpayअसे ठेवण्यात आले आहे. यामुळे जर Google Payसापडत नसेल तर सर्चमध्ये Gpayटाईप करावे, जेणेकरून तुम्हाला गुगल पे ने पेमेंट करता येणार आहे.

2017 पासून दुसरा मोठा बदल
Google Pay हे अ‍ॅप भारतात तेझ या नावाने 18 सप्टेंबर 2017 मध्ये लाँच करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने नाव बदलून ते Google Pay केले होते. यामुळे आधी एवढे लोकप्रिय न झालेले अ‍ॅप हळूहळू भारतीयांच्या मोबाईलमध्ये दिसू लागले. गुगलचा जी आणि पे अशी अक्षरे असलेला लोगो आहे. यामुळे सध्यातरी हे अ‍ॅप सहज ओळखता येते. मोबाईलमध्ये भारंभार अ‍ॅप इन्स्टॉल असतात. त्यातून नेमके गुगल पे अ‍ॅप शोधून काढणे सध्यातरी सोपे आहे. Google Pay सध्या जगातील सर्वाधिक डाउनलोड केलं जाणारं पेमेंट अ‍ॅप बनले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Valentines Day | ‘हाच तो संदेश’ होतोय व्हायरल…

कृषी कायद्यांना विरोध; शेतकरी आंदोलन आणखी 7 महिने लांबणार!