in

50 हजारांपेक्षा अधिकच्या चेक क्लिअरिंग पद्धतीत बदल, 1 सप्टेंबरपासून लागू होणार नवे नियम

तुम्ही बचत खात्यासाठी इंटरनेट बँकिंग (Internet Banking) सुविधा वापरत नसाल तर 50000 रुपयांपेक्षा अधिक मुल्याचा चेक जारी करणं तुम्हाला अडचणीचं ठरू शकतं. याचं कारण म्हणजे बहुतांश बँकांनी पॉझिटिव्ह पे सिस्टिम (PPS) लागू करण्यास सुरुवात केली आहे. अधिकतर बँकांमध्ये 1 सप्टेंबरपासून पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक ट्रंकेशन सिस्टमसाठी (CTS) ऑगस्ट 2020 मध्ये पॉझिटिव्ह पे प्रणालीची घोषणा केली होती. या नियमानुसार, बँकेच्या सर्व खातेधारकांना 50 हजार किंवा त्याहीपेक्षा अधिकच्या रकमेच्या चेकसाठी जारी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे.

बँकेने चेक पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. आरबीआयच्या या नियमाअंतर्गत चेक जारी करण्यााधी तुम्हाला बँकेला याबाबत सूचित करावे लागेल अन्यथा चेक स्विकार केला जाणार नाही. या सिस्टममध्ये 50 हजारहून अधिकच्या चेक पेमेंटसाठी दुसऱ्यांदा रि-कन्फर्म करावं लागेल. या सिस्टमअंतर्गत एसएमएस, मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे चेक लिहिण्याचा तपशील बँकेत जारी करावा लागेल.

त्याद्वारे चेकची तारीख, पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचं नाव, पेयी अर्थात रक्कम घेणाऱ्या व्यक्तीचं नाव, रकमेचे डिटेल्स द्यावे लागतील. चेकचं पेमेंट करण्याआधी हा तपशील पुन्हा तपासला जाईल. जर यामध्ये काही गोंधळ असल्यास चेक रिजेक्ट होईल. ही सुविधा पूर्णपणे ऐच्छिक असेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मतदारसंघातील कार्य प्रणालीचा ऊर्जामंत्री राऊत यांनी घेतला आढावा

‘नारायण राणेंची भाषा योग्य नाही, त्यांच्यावरील कारवाई द्वेषपूर्ण नाही’