in

चासकमान धारण 100 टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या पंधरा दिवसांपासून भीमाशंकर परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने भिमानदीवरील चास-कमान जलाशय 100 टक्के भरला आहे. आज सकाळी पाण्याचा विसर्ग 900 क्युसेकने भिमानदी आणि डाव्या कालव्यात सुरू करण्यात आला आहे.

चास-कमान धरणातुन भिमानदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पुढील काळात धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चास-कमान धरणातील पाणीसाठा वर्षभर शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे शेतकरी वर्गासह नदीकाठच्या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न या निमित्ताने मिटणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात ट्रकचा अपघात, 1 ठार 3 गंभीर जखमी

IND vs ENG 1st Test Day 3 Live : नॉटिंगहॅममध्ये पावसाचा खेळ; खेळाला स्थगित