१० वर्षा पेक्षा अधिककाळ छोट्या पाड्यावर आपली जादू दाखवणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’. या मालिकेतील दया बेन या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. या भूमिकेतून दीशा वाकानी प्रचंड लोकप्रिय झाली. सप्टेंबर 2017 मध्ये दीशा मॅटर्निटी लिव्हवर गेली त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही. आजपर्यंत चाहतेही दया बेनच्या येण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.
असे असताना मात्र मालिकेचे निर्माते असीत मोदीनेयांनी नवीन दयाबेनचा शोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळेदीशा मालिकेत झळकणार नाही हे स्पष्ट झाले असता. तुर्तास दया बेन भूमिकेसाठी नवीन नाव समोर येत आहे.
राखी विजान मालिकेत दया बेनच्या भूमिकेत झळकू शकते. राखी विजानने दिलेल्या मुलाखतीत तिला दया बेन ही भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अधिकृत घोषणे आधी राखीने चाहत्यांना दिलेले संकेत तर नाही ना असेच सा-यांना वाटत आहे. राखी विजानने दया बेन साकारण्याची इच्छा व्यक्त केलेली असली तरी मालिकेच्या निर्मांत्याकडून अजुनतरी कोणत्याही प्रकारेच स्पष्टीकरण आलेले नाही.
दया बेन भूमिकेसाठी माझ्या नावाच विचार करायला काहीच हरकत नसल्याचे तिने म्हटले आहे. त्यामुळे आता मेकर्स राखी विजानचा दया बेनच्या भूमिकेसाठी विचार करतात का हे का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
Comments
Loading…