in

छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देणार एकरकमी एफआरपी

सतेज औंधकर, कोल्हापूर | शेतकऱ्यांना सहाय्य म्हणून एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी सोमवारी केली.

शेतकरी संकटात आहेत त्यामुळे आम्ही दर जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.शाहू साखर 2993 रुपये एफआरपी एक रकमी देणार आहे. सर्वात पहिला दर जाहीर करणारा शाहू कारखाना राज्यातला पहिला कारखाना असून आम्हाला हा दर देणे शक्य आहे, त्यामुळे आम्ही दर देतोय. तसेच कोणत्याही प्रकारे एफआरपीचे तुकडे पाडणार नाही.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या शेतकरीकेंद्री विचारांचा वारसा जपत आपल्या बळीराजाला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी शाहू समूह कायम तत्पर आहे असेही त्यांनी म्हटले आहे. शाहू कारखाना शेतकऱ्यांना ऊसदर देण्यात कायमच महाराष्ट्रात पुढे राहिला आहे. त्यामुळे या कारखान्याच्या विरोधात शेतकरी संघटनेला दरासाठी कधीच आंदोलन करावे लागलेले नाही. याउलट शाहू कारखाना चांगला दर देतो मग तुम्हांला काय धाड भरली आहे का.? अशी विचारणा संघटना करत आल्या आहेत.

आताही शाहू कारखाना एकरकमी एफआरपी देणार असल्याने राज्यातील सर्व कारखान्यावर त्याचा नक्कीच दबाव वाढणार आहे.एका अर्थाने ऊसदराच्या चळवळीला त्याचे बळ मिळणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘अमृता वहिनी म्हणजे अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन’;रुपाली चाकणकरांचे प्रत्युत्तर

Maharashtra Band | जळगावात सेनेच्या महिला कार्यकर्त्यांची दादागिरी; वस्तू घेऊन पळ काढल्याचा दुकानदाराचा आरोप