in ,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, विद्यार्थी नेता शरजील उस्मानी ही उत्तर प्रदेशातील घाण!

पुण्यातील एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने हिंदूंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून आज (बुधवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

विधानसभेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर चर्चा झाली. या चर्चेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. विरोधकांनी पुण्याच्या एल्गार परिषदेत आक्षेपार्ह भाषण करणाऱ्या शरजील उस्मानीच्या अटकेची मागणी भाजपाने केली होती. राज्य सरकारने कारवाई केली नाही तर, आम्ही शरजीलला पाताळातून शोधून काढू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तोच संदर्भ देत, उद्धव ठाकरे यांनी, ‘कधी जाताय?’ असा सवाल केला. पण लगेचच ‘शरजीलला पकडायला’ असे त्यांनी स्पष्ट केले.

शरजील ही उत्तर प्रदेशातील घाण आहे. देशद्रोही पिलावळ उत्तर प्रदेशात जन्म घेत आहे. विशेष म्हणजे, राम मंदिर जिथे उभारले जात आहे, तिथेच असे देशद्रोही आहेत. म्हणजे, पायाच ठिसूळ असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. तसेच त्याला आम्ही अटक करणारच, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

फडणवीसांचे प्रत्युत्तर
शरजील उस्मानी उत्तर प्रदेशातील असला तरी, त्याला तिथे हिंदूंविरोधात बोलण्याचे धाडस नाही. तो महाराष्ट्रात येऊन, तुमच्या नाकावर टिच्चून येथे हिंदूंविरोधात वक्तव्य करून गेला. त्याच्या केसाला धक्का लावण्याची हिम्मत या सरकारची झाली नाही, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हिंदुत्व आम्हाला शिकवू नका, तेवढी तुमची पात्रता नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले

आता 24×7 मिळणार कोरोना लस, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची ग्वाही