in ,

”कोरोनाची साथ सरकारी कार्यक्रम नव्हे”; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी रुग्णसंख्या हवी तशी कमी न झाल्याने लॉकडाऊनचे निर्बंध 15 जूनपर्यंत कायम ठेवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत असताना त्यांनी हि घोषणा केली. तर याच दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले आहे. भाजपमधील अनेक नेते मराठा आरक्षण विरोधी सुप्रीम कोर्टातून आलेल्या निकालानंतर सरकार विरोधी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. या सर्व नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना कमी झाला म्हणुन घाई गर्दीने रत्यावर उतरु नका असा सल्ला दिला. तसेच सरकारने अमुक केले नाही म्हणुन रस्त्यावर उतरणाऱ्यांनो कोरोनाची साथ हा काही सरकारी कार्यक्रम नसल्याचा टोला नाव न घेता हाणला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona Update | राज्यात रिकव्हरी रेट वाढला, रुग्णसंख्येतही घट

पावसाचे आगमन लांबणीवर; केरळमध्ये पावसाचा नवा मुहूर्त