in ,

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन… ‘तो’ परत आला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. या कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतानाच फेसबुकवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. त्यावर पलटवार करताना, मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन…’वरून जोरदार टोलेबाजी केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोलेबाजी करत मोदी सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, करोनाची पुन्हा दुसरी लाट येतेय की काय? अशी स्थिती आहे. कारण रुग्णसंख्या वाढत आहे. मी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावे आणि काय करू नये, हे सांगण्याचा प्रयत्न केला. हा व्हायरस आहे. तो म्हणतोय मी पुन्हा येईन, पुन्हा येईन… काळजी घ्या. दुर्दैवाने थोडसे इकडेतिकडे झाले आणि व्हायरस पुन्हा परत आला, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.

थाळीचा असा वापर
देशातील सर्वात मोठे जम्बो कोविड हॉस्पिटल राज्यात उभारले. राज्य सरकारने राबविलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमाचा फायदा करोना लसीकरणामध्ये होत आहे. महाविकास आघाडी सरकारने करोना काळात नागरिकांना अवघ्या पाच रुपयांना शिवभोजन थाळी दिली. कोरोना आम्ही रिकाम्या थाळ्या वाजवल्या नाहीत. शिवभोजन थाळी अजून सुरू आहे. त्यामुळे भरलेली थाळी आणि रिकामी थाळीतला फरक गरीबांना कळतो, असा टोलाही त्यांनी लगावाला.

अब की बार…
लॉकडाऊन पुन्हा लागू करायचा का? अशी चर्चा आहे. तुम्ही व्यापाऱ्यांची, शेठजींची चिंता जरूर करा. ते नसतील तर अर्थचक्र चालणार नाही. पण युके, जर्मनी, इटली, आणि ऑस्ट्रेलियामध्ये लॉक़ाऊन करण्यात आले आहे. अमरावतीपेक्षा ब्रिटन आणि अमेरिकेची आरोग्यव्यवस्था अमरावतीपेक्षा कमी आहे का? असा सवाल करत, नशीब अमेरिकेत अब की बार ट्रम्प सरकार कुणी ऐकले नाही. नाहीतर अजून वाट लागली असती, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

…तर देशद्रोही ठरवले जाते
कोरोना काळातील खर्चाचा हिशेब आमच्याकडे विचारला जातो. पण जनतेला सोयीसुविधा देण्यासाठी आपला फंड मुख्यमंत्री सहाय्यता निधीला न देता थेट दिल्लीला देण्यात आला. तथापि, पीएम केअर फंडचा हिशोब कोण देणार? त्यांना विचारायचे नाही. कोणी विचारणा केलीच तर, देशद्रोही ठरवले जाते, अशी टीका त्यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चिंताजनक; आजची कोरोना रुग्णसंख्या पोहोचली 10 हजारानजीक

जळगाव वसतिगृह प्रकरण; तृप्ती घोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीस सुरूवात